Anushka Tapshalkar
जगभरातील लोक चहा आणि कॉफीबाबत चर्चा करतात. काहींना गोडसर, हलकी चहाची चव आवडते, तर काहींना कडवट कॉफीची चव आवडते. पण आरोग्याच्या दृष्टीने कोणते उत्तम आहे?
ब्लॅक कॉफी साखर, दूध आणि क्रीमशिवाय बनवली जाते. त्यामुळे ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते कारण ती शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करते.
ब्लॅक कॉफीमध्ये सुमारे 95 मिग्रॅ कॅफिन असते, जे चहा पेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. परंतु याचे अतिसेवन करणे टाळावे.
बिना साखर किंवा दुधाच्या बनवलेल्या कॉफीमध्ये झिरो कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या लोकनासाठी ही योग्य आहे.
ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयविकार आणि मधुमेह सारख्या आजारांशी लढतात.
ब्लॅक कॉफी मेंदूला अधिक सक्रिय ठेवते तसेच लक्ष केंद्रीत करायला मदत करते आणि स्मरणशक्ती सुधारते.
व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी घेतल्याने ऊर्जा वाढते, चरबी घटण्यास मदत होते, आणि शारीरिक कामगिरी सुधारते.
ब्लॅक कॉफीची चव कडवट, स्ट्रॉंग आणि वैशिष्ट्यपूर्ण असते, जी अनेकांना आकर्षित करते.
फक्त पाणी आणि कॉफीपासून सोप्या पद्धतीने तयार होणारी ही कॉफी नैसर्गिक चवीसहच पिणे फायदेशीर ठरते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.