सकाळ डिजिटल टीम
असे म्हणतात की प्रेमाला सिमा नसते, याप्रमाणे हे परदेशी क्रिकेटपटू देशीय सिमा ओलांडून भारतीय मुलींच्या प्रेमात पडले.
या क्रिकेटपटूंनी भारतीय मुलींसोबत लग्न करून संसारही थाटला.
भारताचे जावई असलेल्या या ५ क्रिकेटपटूंबद्दल व त्यांच्या पत्नीबद्दल जाणून घेऊयात.
पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली याने २०१९ साली सामीया अरझू हिच्याशी लग्न केले. सामीया फ्लाईट इंजिनिअर असून ती मूळची हरियाणातील आहे.
श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनने चेन्नईतील मधीमलार राममुर्ती हिच्यासोबत लग्न केले. मधीमलार ही डॉक्टर एस राममुर्ती यांची कन्या आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल विनी रमण हिच्याशी २०२० साली विवाह बंधनात अडकला. विनी फार्मासिस्ट आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने २०२० साली भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत लग्न केले होते. पण आता त्यांचा डिव्होर्स झाला आहे.
ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर शॉन टेट राजस्थान रॉयल्स संघात असताना मोडेल मशूम सिंघाच्या प्रेमात पडला. त्यांनी २०२३ साली लग्न केले.