सकाळ डिजिटल टीम
दिग्गज फलंदाज विराट कोहलीसाठी २०२४ हे वर्ष संघर्षाचे गेले.
विराट त्याच्या खराब बॅटींग फॉर्मसोबत संघर्ष करताना पाहायला मिळाला.
२०२४ मध्ये विराट कोहलीचा फॉर्म पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमपेक्षाही खराब राहिला आहे.
विराटने २०२४ मध्ये ३२ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये २१.८३च्या सरासरीने अवघ्या ६५५ धावा केल्या आहेत.
ज्यामध्ये त्याने केवळ २ अर्धशतके व १ शतक लगावले आहे.
त्याचबरोबर तो एकूण ४ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
बाबर आझमने २०२४ मध्ये ३९ आंतरराष्ट्रीय डावात ३२.४४च्या सरासरीने ११६८ धावा केल्या आहेत.
ज्यामध्ये ९ अर्धशतकांचा समावेश आहे.
बाबरने २०२४ मध्ये ९१.७५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. विराटच्या तुलनेत बाबरसाठी हे वर्ष चांगले गेले.