जून मध्ये बर्फवृष्टी अनुभवायचीय? काश्मीर-मनाली विसरा या राज्याला द्या भेट

Aarti Badade

स्वित्झर्लंड, मालदीवपेक्षा सुंदर!

हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे निसर्गरम्य राज्य आहे पर्यटनप्रेमींसाठी स्वर्ग! चला, पाहूया सिक्किममधील टॉप ठिकाणं…

Experience Snow & Serenity in Sikkim | sakal

गंगटोक (Gangtok)

सिक्किमची राजधानी आणि सांस्कृतिक केंद्र. कंचनजंघाचे विहंगम दृश्य आणि मठ, बाजारपेठा, केबल कारसारखे पर्यटक आकर्षण.

Experience Snow & Serenity in Sikkim | Sakal

पेलिंग (Pelling)

कंचनजंघाच्या पायथ्याशी वसलेलं सुंदर गाव. येथे स्काय वॉक, मठ, झरने, आणि ट्रेकिंगसारखे अ‍ॅडव्हेंचरही करता येतात.

Experience Snow & Serenity in Sikkim | Sakal

लाचेन आणि लाचुंग

हिमालयातील दोन नितांत सुंदर गावं. गुरुडोंगमार सरोवर आणि लाचुंग मठांसह याक सफारीचा रोमांच अनुभवता येतो.

Experience Snow & Serenity in Sikkim | Sakal

युमथांग व्हॅली (Valley of Flowers)

फुलांनी सजलेली दरी. फेब्रुवारी ते जून हे सुंदर फुलांचं पर्व. शिंगबा अभयारण्यात रोडोडेंड्रॉनच्या 24 प्रजाती.

Experience Snow & Serenity in Sikkim | Sakal

जीरो पॉइंट (Zero Point)

समुद्रसपाटीपासून 15,300 फूट उंचीवर असलेलं बर्फाचं ठिकाण. जूनमध्येही येथे बर्फ अनुभवता येतो. विशेष परमिट आवश्यक.

Experience Snow & Serenity in Sikkim | Sakal

नामची आणि रावंगला

दक्षिण सिक्किममधील सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनस्थळं. बुद्ध पार्क, चारधाम मंदिर, टी इस्टेट आणि अनेक मठ प्रसिद्ध.

Experience Snow & Serenity in Sikkim | Sakal

झुलुक (Zuluk)

रेशीम मार्गावरचं ऐतिहासिक ठिकाण. थम्बी आणि लुंगथुंग व्ह्यू पॉइंट्समधून कंचनजंघाचं अप्रतिम दृश्य. परमिट आवश्यक.

Experience Snow & Serenity in Sikkim | Sakal

नाथुला पास (Nathula Pass)

भारत-तिबेट सीमेला जोडणारा ऐतिहासिक दर्रा. बाबा हरभजन सिंग मंदिर आणि त्सोमगो लेक जवळच. यासाठीही परमिट लागतं.

Experience Snow & Serenity in Sikkim | Sakal

निसर्गाची ओढ निर्माण करणारी 'ही' आहे जगातील सर्वात सुंदर नदी

Beautiful River | sakal
येथे क्लिक करा