सकाळ डिजिटल टीम
जगात अनेक नद्या आहेत पण त्यातीत सर्वाक सुंदर नदी कोणती आहे.
जगातील नद्यांपैकी सर्वात सुंदर नदी कोणती तुम्हाला माहीत आहे का?
जगातील सर्वात सुंदर नदी कोणती आहे जाणून घ्या.
निसर्गाचे सौंदर्य पहायला सर्वांनाच आवडते. दऱ्याखोऱ्यांमधून झुळुझुळू वाहणाऱ्या नद्यांचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं.
मात्र कोलंबियातील क्रेनो क्रिस्टल या नदीच्या सौंदर्याचं वर्णय शब्दात करता येणार नाही.
वर्षातील काही महिने ही नदी बाकी नद्यांप्रमाणे सामान्य असते. मात्र जुलै ते नोव्हेंबरदरम्यान या नदीचे पात्र सप्तरंगी होते.
जुलै ते नोव्हेंबर या काळात नदीच्या पात्रात मॅकरेनिया क्लेविग्रा नावाची रोपे उगवतात. त्यामुळे नदीतील पात्र विविधरंगी होते.
मॅकरेनिया क्लेविग्राच्या रोपांमुळे नदीच्या पात्रात हिरवा, नारिंगी, लाल, पिवळा आणि निळ्या रंगाची उधळण झाल्याचा भास होतो.
वेगवेगळ्या रंगाची मुक्त उधळण झाल्याने नदीचे पात्र सप्तरंगी झाल्यासारखे भासते.