Saisimran Ghashi
आपण अचानक अनेक लहान मोठ्या गोष्टी विसरून जातो.
आपल्याला हे सामान्य वाटते पण कधीकधी ही धोक्याची घंटा असू शकते.
कारण सतत लहान सहान गोष्टी विसरणे हे गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
हा मेंदूशी संबंधित आजार आहे ज्यामध्ये हळू हळू मेमरी लॉस होते.
या आजारात आठवण्याची क्षमता कमी होत जाते.
B12 ची कमतरता जेव्हा मेंदूवर परिणाम करू लागते तेव्हा आठवण्याची क्षमता कमी होते.
मानसिक ताणतणाव आणि चिंता यामुळे देखील स्मरणशक्ती कमी होते.
वारंवार विसरणं सुरू झाल्यास आणि ते दैनंदिन जीवनात अडथळा आणत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.