एकेकाळचा सुपरस्टार हाजीअली येथे भीक मागत होता

Aarti Badade

गाण्यामागची हृदयद्रावक कहाणी!

१९५८ मध्ये आलेल्या ‘साधना’ या चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यामागे एक भावनिक किस्सा लपलेला आहे.

sadhna movie | Sakal

'आज क्यूं हमसे पर्दा है’ हे गाणे

साहिर लुधियानवी यांचे 'आज क्यूं हमसे पर्दा है' हे गाणे आजही लोकप्रिय आहे. पण त्यामागे एक विसरलेला चेहरा होता!

Sahir Ludhianvi | Sakal

साहिर लुधियानवींचा अचानक थांबलेला प्रवास

साहिर बी.आर. फिल्म्सच्या कार्यालयाकडे जात असताना, त्यांनी रस्त्यावर एका म्हाताऱ्या माणसाला भीक मागताना पाहिले.

Sahir Ludhianvi | Sakal

कोणीही न ओळखलेला तो माणूस...

खराब कपडे, थकलेले शरीर असलेला तो माणूस... पण साहिर त्याला पाहताच धावत गेले!

Sahir Ludhianvi | Sakal

साहिरने त्या माणसाला आधार दिला!

साहिर त्या व्यक्तीला उचलून थेट चित्रपट स्टुडिओत घेऊन गेले. त्यांनी त्याच्यासाठी जेवण मागवले.

Sahir Ludhianvi | Sakal

बी.आर. चोप्रांना स्पष्ट उत्तर

साहिर म्हणाले – “गाण्यात याच व्यक्तीला घेणार! हे खूप मोठे नाव आहे!”

B. R. Chopra | Sakal

तो व्यक्ती म्हणजे... मास्टर निसार!

१९३० च्या दशकात मास्टर निसार हे लोकांचे लाडके कलाकार होते!

Master Nissar | Sakal

हरवलेले मोठेपण

बोलपटांच्या सुरुवातीच्या काळात गाजलेले मास्टर निसार नंतर लोकांच्या विस्मृतीत गेले... त्यांना काम मिळेनासे झाले.

Master Nissar | Sakal

ज्याला आधार दिला, तो एकेकाळी लाखो लोकांच्या हृदयाचा राजा होता!

साहिरने ज्याला रस्त्यावर आधार दिला, त्याच्यासाठी एकेकाळी लोक वेडे झाले होते!

Master Nissar | Sakal

एक दुःखद शेवट

अखेरीस आजारपणात त्यांचा मृत्यू झाला... आणि त्यांच्यामागे रडायला कोणीही नव्हते.

Master Nissar | Sakal

थंडगार पावसात गरम गरम कोल्हापुरी तांबडा रस्सा; भन्नाट कॉम्बो नक्की ट्राय करा!

Kolhapuri Tambda Rassa | Sakal
येथे क्लिक करा