Aarti Badade
चिकन स्वच्छ धुवून त्यावर हळद आणि मीठ चोळून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवा.
कांदा, सुकं खोबरं, आलं-लसूण, खडे मसाले, तीळ, खसखस हे सर्व कोरडे भाजून वाटा. हीच रेसिपीची जान आहे!
तेल गरम करून त्यात मिरची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, कांदा, मसाले टाका आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
मॅरिनेट केलेलं चिकन फोडणीत टाकून छान परता. त्यावर वाटण घाला आणि तेल सुटेपर्यंत शिजवा.
आवडीनुसार गरम पाणी घालून झणझणीत तांबडा रस्सा तयार करा. चवीनुसार मीठ घाला.
हवे असल्यास चिकन वेगळं करून सुकं चिकन बनवा. किंवा रस्स्याबरोबरच वाढा!
रस्सा सुप म्हणून प्यायला घ्या आणि अस्सल कोल्हापुरी तडका अनुभवायला विसरू नका!