सकाळ डिजिटल टीम
राधिकाराजे गायकवाड या माजी क्रिकेटपटूच्या पत्नी आहेत. त्या गुजरातमधील बडोदा येथे रहातात.
राधिकाराजे या १८ व्या शतकात गुजरातमध्ये राज्य करणाऱ्या गायकवाड घराण्यातील महाराणी आहेत.
राधिकाराजे यांचा गुजरातमध्ये महाल आहे. लक्ष्मी विलास पॅलेस असे, त्यांच्या घराचे नाव आहे.
ज्याची किंमत जवळपास २५ हजार कोटी इतकी आहे.
बडोद्यामध्ये 'बडोदा पॅलेस' नावाने प्रसिद्ध असलेला हा महाल १८९० साली बनवण्यात आला होता.
हा महाल ४ मजली असून महालामध्ये १७० खोल्या आहेत. ७०० एकरमध्ये हा महाल उभारण्यात आला आहे.
मुकेश अंबानींचा एंटिलिया हा बंगला ४८,७८० स्केअर फूटमध्ये हा बांधण्यात आला आहे. पण हा महाल ३० लाख स्केअर फूटचा आहे.
महाराणी राधिकाराजे ह्या माजी क्रिकेटपटू महाराजा समरजित सिंह गायकवाड यांच्या पत्नी असून त्यांनी २००२ मध्ये लग्न केले.