आशुतोष मसगौंडे
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. 1991 मध्ये, तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमच्या आत्मघाती बॉम्बरने त्यांची हत्या केली.
आत्मघातकी हल्लेखोराने बेल्ट बॉम्बस्फोट केला होता, ज्यात राजीव गांधींसह अनेक लोक मारले गेले होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर 21 मे 1991 हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून घोषित करण्यात आला.
राजीव गांधी तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे निवडणुकीच्या सभेला गेले होते. सभेपूर्वी लोकांचे अभिवादन स्वीकारत राजीव गांधी पुढे जात असताना, LTTE च्या महिला सदस्याने कपड्यांमध्ये स्फोटके लपवून राजीव गांधींच्या पाया पडण्याच्या बहाण्याने स्फोट केला.
भारताचे सहावे पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या आई आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर वयाच्या ४० व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत, जे अत्यंत महत्त्वाचे आणि दूरगामी ठरले आहेत.
राजीव गांधी यांनी 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत देशातील शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना केली.
राजीव गांधी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार केला. देशात संगणकाच्या वापराला चालना दिली. सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले.देशाची अर्थव्यवस्था उदार करण्याचा प्रयत्न केला.
राजीव यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती, त्यांच्याकडे व्यावसायिक पायलटचा परवानाही होता.
देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांना सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न" मिळाला. राजीव यांची हत्या श्रीलंकेतील सशस्त्र तमिळ फुटीरतावादी संघटना एलटीटीईने केली होती.