Pranali Kodre
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे आठ संघ सहभागी होणार आहेत.
या आठ संघांची या आठ संघांची साखळी फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघ पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश या संघांसह अ गटात आहे, तर इतर चार संघ ब गटात आहेत.
साखळी फेरीनंतर दोन्ही गटातील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. साखळी फेरीत प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी उपांत्य सामने खेळले जातील. अंतिम सामना ९ मार्च रोजी पार पडेल.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलने खेळली जाणार असल्याने भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळेल, तर इतर संघ पाकिस्तानमध्ये त्यांचे सामने खेळणार आहेत.
भारताचे सर्व सामने दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील.
जर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर त्यांचा उपांत्य सामनाही दुबईत होईल. तसेच अंतिम सामनाही भारताने गाठला, तर तो देखील दुबईत होईल. पण जर भारत अंतिम सामन्यात पोहचला नाही, तर मात्र तो सामना पाकिस्तानमध्ये होईल.
भारताचे साखळी फेरीतील वेळापत्रकावर नजर टाकू.
भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध दुपारी २.३० वाजता सुरू होईल.
भारताचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता सुरू होईल.
भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध २ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता सुरू होईल.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.