नववर्षाची लॉटरी! 1 जानेवारीपासून ‘या’ 5 राशींवर शनि-शुक्राची खास कृपा

Aarti Badade

२०२६ मध्ये ग्रहांची मोठी चाल!

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच १५ जानेवारीला शनि आणि शुक्र यांच्या संयोगाने 'लाभ दृष्टी राजयोग' निर्माण होत आहे. यामुळे ५ राशींच्या आयुष्यात सुख, संपत्ती आणि वैभवाचा वर्षाव होणार आहे.

Horoscope 2026 New Year Prediction

|

Sakal

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी हा राजयोग अडकलेली कामे पूर्ण करणारा ठरेल. नोकरीत पदोन्नती, व्यवसायात मोठा नफा आणि नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठीही हे वर्ष यशाचे असेल.

Horoscope 2026 New Year Prediction

|

Sakal

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आईसोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि मालमत्तेत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

Horoscope 2026 New Year Prediction

|

Sakal

सिंह राशी

सिंह राशीच्या जातकांना व्यवसायात मोठी भरभराट पाहायला मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमचा बँक बॅलन्स वाढेल. समाजात प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल.

Horoscope 2026 New Year Prediction

|

Sakal

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीवर शुक्राची कृपा राहील, ज्यामुळे विलासी जीवनशैली मिळेल. जुन्या कायदेशीर वादातून सुटका होईल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळेल.

Horoscope 2026 New Year Prediction

|

Sakal

मीन राशी

शेअर मार्केट किंवा जुन्या गुंतवणुकीतून मीन राशीच्या लोकांना प्रचंड नफा मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल.

Horoscope 2026 New Year Prediction

|

Sakal

शनि-शुक्राचा 'लाभ दृष्टी योग'

वैदिक ज्योतिषानुसार शनि आणि शुक्र हे मित्र ग्रह आहेत. १५ जानेवारीला हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून ९० अंशांवर आल्याने 'लाभ दृष्टी योग' तयार होत आहे, जो आर्थिक समृद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

Horoscope 2026 New Year Prediction

|

Sakal

तुमची रास यात आहे का?

१ जानेवारीपासूनच या बदलांची चाहूल लागेल. २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी प्रगतीचे आणि सुखाचे ठरो! आजच तुमच्या भविष्याचे नियोजन करा.

स्वतःचाच शत्रू बनताय? चाणक्यांनी सांगितलेल्या या सवयी तात्काळ बदला

Chanakya Niti

|

Sakal

येथे क्लिक करा