श्रेयस अय्यर भारताचा T20I कॅप्टन होणारा चौथा 'मुंबईकर'

Pranali Kodre

नवा टी२० कर्णधार

श्रेयस अय्यरला ६ जून २०२६ रोजी भारताचा टी२० कर्णधार म्हणून बीसीसीआयकडून नियुक्त केले.

Shreyas Iyer

|

Sakal

१५ वा कर्णधार

श्रेयस अय्यर आता भारताचा १५ वा टी२० कर्णधार बनला आहे.

Shreyas Iyer

|

Sakal

चौथा 'मुंबईकर' कर्णधार

याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करत असताना भारताचा टी२० कर्णधार बनणारा तो चौथा खेळाडू आहे.

Shreyas Iyer

|

Sakal

अजिंक्य रहाणे

यापूर्वी मुंबईच्या अजिंक्य रहाणेने सर्वात आधी २०१५ मध्ये २ टी२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते, ज्यात एक विजय आणि एक पराभव स्वीकारला होता.

Ajinkya Rahane

|

Sakal

रोहित शर्मा

त्यानंतर मुंबईच्या रोहित शर्माने २०१७ ते २०२४ दरम्यान ६२ टी२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, ज्यात ४९ विजय, १२ पराभव आणि १ बरोबरी स्वीकारली.

Rohit Sharma

|

Sakal

सूर्यकुमार यादव

मुंबईच्या सूर्यकुमार यादवने २०२३ ते २०२६ दरम्यान ५२ टी२० सामन्यांत भारताचे नेतृत्व करताना ४० विजय, ८ पराभव आणि २ बरोबरी स्वीकारली.

Suryakumar Yadav

|

Sakal

सूर्याची जागा घेणार श्रेयस

आता श्रेयस सूर्यकुमारची जागा घेणार असून भारताचे टी२०मध्ये नेतृत्व करताना दिसेल.

Shreyas Iyer

|

Sakal

भारताचे टी२० कर्णधार

दरम्यान, या चौघांशिवाय विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना, विराट कोहली, शिखर धवन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनीही भारताचे टी२०मध्ये नेतृत्व केले आहे.

Virat Kohli - MS Dhoni

|

Sakal

भारताच्या टी२० संघाचा नवा कर्णधार; श्रेयस अय्यरच का?

Shreyas Iyer - India New T20I Captain

|

Sakal

येथे क्लिक करा