भारताच्या टी२० संघाचा नवा कर्णधार; श्रेयस अय्यरच का?

Pranali Kodre

नवा टी२० कर्णधार

सूर्यकुमार यादवला आता भारताच्या टी२० संघातून बाहेर केलं जाणार आणि श्रेयस अय्यर नवा टी२० कर्णधार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

Shreyas Iyer - India New T20I Captain

|

Sakal

अडीच वर्षांपासून भारतासाठी खेळला नाही टी२०

पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. गेल्या अडीच वर्षांपासून श्रेयस भारतासाठी एकही टी-२० सामना खेळलेला नाही. तो शेवटचा डिसेंबर २०२३ मध्ये भारताकडून टी२० सामना खेळला आहे.

Shreyas Iyer - India New T20I Captain

|

Sakal

निडर नेतृत्व

मग असं असताना अचानक त्याच्या नावाचा विचार का झाला? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याने गेल्या काही वर्षात दाखवलेले निडर नेतृत्व. श्रेयसने आयपीएलमध्ये स्वतःला एक यशस्वी लीडर म्हणून सिद्ध केलं आहे.

Shreyas Iyer - India New T20I Captain

|

Sakal

तीन संघांना पोहचवलं IPL फायनलपर्यंत

त्याने २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सला, २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला आणि २०२५ मध्ये पंजाब किंग्सला, अशा ३ वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्याचा पराक्रम केला.

Shreyas Iyer - India New T20I Captain

|

Sakal

आयपीएल विजेतेपद

त्याच्या नेतृत्वात २०२४ मध्ये केकेआरला त्याने विजेतेपदही मिळवून दिले आहे.

Shreyas Iyer - India New T20I Captain

|

Sakal

धावांचाही पाऊस

फक्त नेतृत्वच नाही, तर फलंदाज म्हणूनही त्याने आयपीएलच्या गेल्या दोन्ही हंगामात धावांचा पाऊस पाडलाय. त्याने २०२५ मध्ये ६०४ धावा आणि २०२६ मध्ये ४९८ धावा केल्या आहेत.

Shreyas Iyer - India New T20I Captain

|

Sakal

वनडेत उपकर्णधार

इतकंच नाही तर तो भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधारही आहे आणि संघातील प्रमुख फलंदाजही आहे.

Shreyas Iyer - India New T20I Captain

|

Sakal

मोठ्या स्पर्धा

आता बीसीसीआय २०२८ च्या ऑलिम्पिक आणि टी-२० वर्ल्ड कपचाही विचार करत आहे. या मोठ्या स्पर्धांसाठी टीम इंडियाला एका अनुभवी आणि चॅम्पियन कर्णधाराची गरज आहे.

Team India

|

Sakal

श्रेयस अय्यर

त्यामुळे सध्यातरी श्रेयस एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला.

Shreyas Iyer - India New T20I Captain

|

Sakal

IPL 2027: धोनीच्या खेळण्यावर सस्पेन्स! CSK कोणाला रिलीज करणार?

CSK Probable releases IPL 2027

|

Sakal

येथे क्लिक करा