Varsha Balhe
ओळख लांडगा आणि कोल्हा हे दोघेही कुत्र्याच्या कुळातील प्राणी आहेत. पण त्यांचा आकार, दिसणं आणि राहण्याची पद्धत वेगवेगळी असते.
FOX VS WOLF DIFFERENCE
esakal
लांडगा हा कोल्ह्यापेक्षा मोठा आणि मजबूत असतो. कोल्हा मात्र आकाराने लहान आणि चपळ असतो.
FOX VS WOLF DIFFERENCE
esakal
लांडग्याच्या अंगावर राखाडी, तपकिरी किंवा काळसर रंगाची छटा दिसते. कोल्ह्याचा रंग अनेकदा लालसर-तपकिरी असतो आणि त्याची शेपटी झुबकेदार असते.
FOX VS WOLF DIFFERENCE
esakal
लांडगे अनेकदा कळपाने राहतात आणि मिळून शिकार करतात. कोल्हे मात्र सहसा एकटे किंवा लहान कुटुंबासोबत राहतात.
FOX VS WOLF DIFFERENCE
esakal
लांडगे ससे आणि हरणांसारख्या प्राण्यांची शिकार करू शकतात. कोल्हे उंदीर, लहान पक्षी आणि इतर छोटे प्राणी खातात. ते फळंही खातात.
FOX VS WOLF DIFFERENCE
esakal
लांडगे रात्री लांबपर्यंत ऐकू जाणारा आवाज काढतात. कोल्हेही वेगवेगळे आवाज काढतात. त्यांच्या आवाजाला कोल्हेकुई असंही म्हणतात.
FOX VS WOLF DIFFERENCE
esakal
कोल्ह्याची शेपटी लांब आणि दाट केसांची असते. लांडग्याची शेपटीही केसाळ असते, पण त्याचं शरीर मोठं आणि बांधा अधिक मजबूत असतो.
FOX VS WOLF DIFFERENCE
esakal
एखादा प्राणी दिसल्यास त्याचा आकार, चेहरा आणि शेपटी पाहून अंदाज लावता येतो. मोठा, मजबूत बांधा असेल तर तो लांडगा असण्याची शक्यता जास्त; तर लहान शरीर आणि झुबकेदार शेपटी असेल तर तो कोल्हा असू शकतो.
FOX VS WOLF DIFFERENCE
esakal
LEOPARD VS CHEETAH
esakal