सतत ईयरबड्स वापरताय? सावधान! आरोग्यावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Monika Shinde

डिजिटल युगात

आजच्या डिजिटल युगात ईअरबड्स हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे.

सतत ईअरबड्सचा वापर

संगीत ऐकणे, कॉल्सवर बोलणे, व्हिडिओ बघणे यासाठी सतत ईअरबड्स वापरण्यात येतात. मात्र याचे दीर्घकालीन वापरामुळे काही गंभीर आरोग्यविषयक त्रास उद्भवू शकतात.

ऐकण्याची क्षमता कमी होणे

सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने कानातील संवेदनशील पेशींवर ताण येतो. यामुळे हळूहळू ऐकू येण्याची ताकद कमी होते आणि कधी-कधी कायमस्वरूपी बहिरेपणाही येऊ शकतो.

संसर्ग होण्याची शक्यता

ईअरबड्स वापरताना जर स्वच्छता पाळली गेली नाही, तर कानात घाम आणि आर्द्रता साठते. त्यामुळे बॅक्टेरिया व बुरशी वाढतात आणि त्यामुळे खाज, जळजळ, किंवा पूयुक्त संसर्ग होऊ शकतो.

कानातील अडकलेला कचरा

ईअरबड्स कानाच्या आत खूप खोल घातल्यास, कानातील नैसर्गिक मळ बाहेर पडण्याऐवजी आतच साठतो. त्यामुळे कान भरल्यासारखा वाटतो आणि स्पष्ट ऐकू येण्यात अडथळा निर्माण होतो.

आजूबाजूचा आवाज बंद होतो

ईअरबड्स लावल्यामुळे बाहेरील ध्वनी कमी होतो, जे काही वेळेस धोकादायक ठरू शकते. विशेषतः रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना. अपघात होण्याचा धोका वाढतो.

डोकं भारी वाटणे व थकवा

कानांवर सतत आवाजाचा दाब पडल्यामुळे मेंदूवरही परिणाम होतो. त्यामुळे डोकेदुखी, थकवा किंवा चक्कर येणे यांसारखी लक्षणं दिसू शकतात.

त्वचेची अ‍ॅलर्जी

काही लोकांना ईअरबड्स बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यापासून (जसे सिलिकॉन किंवा प्लास्टिक) अ‍ॅलर्जी होते. यामुळे कानाच्या भोवती खाज, सूज किंवा रॅशेस होऊ शकतात.

समाजापासून दूर जाणे

ईअरबड्स सतत लावल्याने आपण अनेकदा इतरांशी संवाद साधण्याचे टाळतो. यामुळे सामाजिक संवादात अडथळा निर्माण होतो आणि मानसिकदृष्ट्या एकटेपणा जाणवतो.

पावसाळ्यात बाहेरची भजी विसरा! घरच्या घरी तयार करा सोलापूरची खास आंध्र भजी

येथे क्लिक करा