Monika Shinde
राज्यभरात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. अशा वेळी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते, म्हणून अनेक जण बाहेर पावसात भिजत जातात.
पण आता तुम्ही घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीने सोलापूरची खास आंध्र भजी बनवू शकता आणि घरबसल्या पावसाचा आनंद घेऊ शकता.
बेसन १ कप, मोठे हिरवी मिरची५-६, हळद, लाल तिखट, मीठ, जिरे, चिंच, तेल
एका वाटीमध्ये चिंच १५ मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा. नंतर त्यात थोडा गूळ घालून त्याचा कोळ तयार करा.
हिरवी मिरची मध्यभागी कापून घ्या मग त्यात तयार केलेलं चिंचेचं कोळ भरा आणि १५ - २० मिनिट साठी त्या मिरच्या फ्रिजर मध्ये सेट व्हायला ठेवा.
एका भांड्यात बेसन घ्या. त्यात हळद, लाल तिखट, मीठ, जिरे घालून एकजीव करून चांगले मिश्रण तयार करा.
एका कढईत तेल गरम करा. तयार केलेल्या बेसन पिठात मिरच्या घालून त्याचे छोटे तुकडे कढईत टाका आणि मंद आचेवर भजी तळा.