पायात वारंवार गोळे येतात? याचा मधुमेहाशी काय संबंध आहे?

Aarti Badade

रात्री पायात वारंवार गोळे येतात?

रात्री अचानक पायात गोळा येण्यामागे थकवा किंवा पाण्याची कमतरता यांसोबत रक्तशर्करेतील बदलही एक कारण असू शकतात.

diabetes leg pain

|

Sakal

ब्लड शुगरचा गोळ्यांशी संबंध असू शकतो!

रक्तशर्करा वाढून नंतर कमी होत असल्यास शरीरातून पाणी आणि सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखी खनिजं कमी होऊ शकतात.

diabetes leg pain

|

Sakal

खनिजांची कमतरता वाढवू शकते त्रास!

स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणासाठी आवश्यक खनिजं कमी झाल्यास पायात गोळे येण्याची शक्यता वाढू शकते.

diabetes leg pain

|

Sakal

मधुमेहामुळे नसांवरही परिणाम होऊ शकतो!

रक्तशर्करा दीर्घकाळ अनियंत्रित राहिल्यास नसांचं नुकसान म्हणजेच न्यूरोपॅथी होऊन स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात.

diabetes leg pain

|

Sakal

रक्ताभिसरणातील अडचणीही कारणीभूत!

रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्यास स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन न मिळून विशेषतः व्यायाम किंवा हालचालींनंतर गोळे येऊ शकतात.

diabetes leg pain

|

Sakal

फक्त ब्लड शुगरलाच दोष देऊ नका!

पाणी आणि खनिजांची कमतरता, नसांचं नुकसान, रक्ताभिसरणातील समस्या आणि इतर घटकांमुळेही पायात वारंवार गोळे येऊ शकतात.

diabetes leg pain

|

Sakal

वारंवार गोळे येत असतील तर तपासणी करा!

विशेषतः मधुमेह असल्यास रक्तशर्करा नियंत्रणासोबत शरीरातील पाणी, खनिजं, नसांचं कार्य आणि रक्ताभिसरण याकडेही डॉक्टरांच्या सल्ल्याने लक्ष द्या.

diabetes leg pain

|

Sakal

रक्तपेशींच्या आरोग्यासाठी आहारात असावी ‘ही’ ६ फळे!

fruit blood health 

|

Sakal

येथे क्लिक करा