Aarti Badade
एका ताज्या सर्वेक्षणानुसार, भारतातील ५२% प्रौढांना दर महिन्याला पायात तीव्र वेदना किंवा क्रॅम्प्स जाणवतात. 'सामान्य वेदना' म्हणून दुर्लक्ष करतो, पण हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
Leg Cramps Warning
Sakal
शरीरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असल्यास स्नायूंना वारंवार गोळे येतात. भारतातील ३५% पेक्षा जास्त लोकांमध्ये ही कमतरता आढळते, ज्यामुळे स्नायू लवकर थकतात.
Leg Cramps Warning
Sakal
दिवसातून ८ ते १० तास बसून काम करणे किंवा व्यायाम न करणे यामुळे पायांमधील रक्ताभिसरण मंदावते. यामुळे पाय सुन्न होणे आणि व्हेरिकोज वेन्सचा त्रास वाढतो.
Leg Cramps Warning
sakal
भारतात अधिक मधुमेही आहेत. यापैकी २५% रुग्णांना 'डायबेटिक फूट'चा धोका असतो. दरवर्षी १ लाखांहून अधिक पाय कापण्याची वेळ येते, कारण ४०% रुग्ण वेळेवर तपासणी करत नाहीत.
Leg Cramps Warning
Sakal
तब्बल ६२% भारतीय चुकीच्या मापाचे किंवा कडक सोलचे बूट/चप्पल वापरतात. यामुळे पायांच्या नसांवर दाब येतो (Nerve Compression) आणि पायांच्या हाडांची रचना बिघडते.
Leg Cramps Warning
Sakal
अभ्यासानुसार, महिलांमध्ये पायांचे क्रॅम्प्स येण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा १.४ पट अधिक आहे. हार्मोन्समधील बदल आणि घरकामांमधील सततची उभा-बस ही यामागील प्रमुख कारणे आहेत.
Leg Cramps Warning
Sakal
पाणी कमी प्यायल्याने क्रॅम्प्सचा धोका दुप्पट होतो. तसेच, अतिरिक्त वजनामुळे पायांवर ३० ते ४०% जास्त भार पडतो, ज्यामुळे टाच दुखणे आणि प्लांटर फॅसिआइटिसचा त्रास होतो.
Leg Cramps Warning
Sakal
पुरेसे पाणी प्या, आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा, नियमित व्यायाम करा आणि चपला निवडताना आरामदायी निवडा. वेदना सतत असल्यास सल्ला नक्की घ्या.
Leg Cramps Warning
Sakal
Benefits of Quitting Sugar
Sakal