Aarti Badade
शरीरात पाण्याची कमतरता जांभईचे एक कारण असू शकते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
खोल आणि हळूहळू श्वास घेतल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे थकवा आणि जांभई कमी होतात.
हलका व्यायाम किंवा चालणे केल्याने शरीर ताजेतवाणे होते आणि जांभई कमी होण्यास मदत होते.
संतुलित आहारात पुरेशी प्रथिने, फळं आणि भाज्या असाव्यात. कॅफिन देखील जांभई कमी करण्यास मदत करू शकतो.
झोपेच्या कमतरतेमुळे जांभई येऊ शकते. त्यामुळे पुरेशी आणि गाढ झोप घेण्याचा प्रयत्न करा.
ताणामुळे देखील जांभई येऊ शकते. योगा, ध्यान किंवा विश्रांती यामुळे ताण कमी होतो.
वरील उपायांनंतरही जांभई येत असल्यास, कोणत्याही आरोग्य समस्येची शक्यता असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.