Monika Shinde
शुक्रवारचा दिवस आहे लक्ष्मी देवीचा. योग्य उपाय आणि श्रद्धा ठेवली तर तुमच्या घरात धन, सौख्य आणि शांती नक्कीच वास करेल.
शुक्रवारी कोणताही वाद, भांडण टाळा. विशेषतः पती-पत्नीमध्ये शांततेने वागा. घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
या दिवशी पत्नीला झाडू-पोछा करू देऊ नका. शास्त्रानुसार, त्यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते आणि आर्थिक हानी होण्याची शक्यता वाढते.
जर पत्नी व्रत किंवा पूजेमध्ये गुंतलेली असेल, तर तिची एकाग्रता भंग होणार नाही, याची काळजी घ्या. श्रद्धेचा अपमान अशुभ परिणाम घडवू शकतो.
शब्दांमध्ये प्रेम असू द्या. पत्नीचा सन्मान करा, तिला मदत करा. अशा वागणुकीने नात्यात गोडवा येतो आणि लक्ष्मीची कृपा मिळते.
शुक्रवारी तीन इलायची स्वतःवरून फिरवून ती घरात एखाद्या स्वच्छ जागी ठेवा. हा उपाय सलग ३ शुक्रवारी करा. नात्यात प्रेम वाढते.
पाच तुळशीची पानं देवी लक्ष्मीला अर्पण करा. पूजेनंतर ती पानं लाल वस्त्रात बांधून जवळ ठेवा. यामुळे धनप्राप्तीचा योग निर्माण होतो.