वसुबारसच्या दिवशी काय करावं अन् काय करू नये?

Monika Shinde

वसुबारस म्हणजे काय?

वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी या दिवशी गाई आणि वासरांची पूजा केली जाते. हा दिवाळीचा पहिला सण मानला जातो. या दिवशी सतीत्वाचं प्रतीक मानलं जातं. यंदा १७ ऑक्टोबर रोजी वसुबारस सण केला जाणार आहे.

या दिवशी गाईची पूजा का करतात?

गाईला आपली माता समजलं जातं. वसुबारसीच्या दिवशी गाई-वासराचं पूजन करून त्यांचं ऋण मानलं जातं. गाईचं दूध, शेण आणि गोमूत्र पवित्र मानलं जातं.

वसुबारसला काय करावं?

गाईला अंघोळ घालावी, सुंदर रांगोळी काढावी, हार-फुलांनी सजवावं. गाईला नैवेद्य द्यावा व गाईची प्रदक्षिणा करून तिचं पूजन करावं.

वसुबारसला काय खावं?

या दिवशी साधं व सत्विक जेवण केलं जातं. अनेकजण दूध, गूळ, फळं आणि तुपाचं सेवन करतात. काही भागात उपवासही केला जातो.

वसुबारसला काय करू नये?

या दिवशी मांसाहार, मद्यपान, तंबाखू यांपासून दूर राहावं. गाईला त्रास होईल असं कोणतंही वागणं टाळावं. कुणालाही अपशब्द बोलू नयेत.

महिलांसाठी विशेष महत्त्व

वसुबारसला विवाहित स्त्रिया सतीत्व, सुखी संसारासाठी व्रत पाळतात. गाईची सेवा केल्याने सौभाग्य टिकतं, असं मानलं जातं.

धार्मिक दृष्टिकोन

वसुबारस धर्म, श्रद्धा आणि निसर्गाशी जोडलेला सण आहे. गाईचं पूजन म्हणजे पृथ्वीमातेचा सन्मान. त्यामुळे हा दिवस अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

पूजा करताना शुद्ध मन, स्वच्छ परिसर आणि श्रद्धा हवी. गाईला प्रेमाने हाक द्या. तिची सेवा करा. वसुबारस म्हणजे कृतज्ञतेचा सण आहे.

दिवाळीच्या काळात 'ही' 5 कामे करा, वाढेल सौभाग्य!

येथे क्लिक करा