Varsha Balhe
फ्रिज दिवसभर सुरू असतो, त्यामुळे त्याचा वीज वापरही सतत होत असतो. पण फ्रिज वापरताना केलेल्या काही छोट्या चुका टाळल्या, तर वीज वाचवता येऊ शकते. तापमान योग्य ठेवण्यापासून ते फ्रिजच्या मागे पुरेशी जागा ठेवण्यापर्यंत काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
FRIDGE ELECTRICITY SAVING TIPS
esakal
फ्रिजचं तापमान नेहमी अगदी कमी ठेवण्याची गरज नसते. कंपनीने सांगितलेल्या योग्य तापमानावर ते सेट करा. खूप जास्त कूलिंग ठेवलं तर वीज जास्त खर्च होऊ शकते.
FRIDGE ELECTRICITY SAVING TIPS
esakal
फ्रिजमध्ये खूप सामान कोंबून ठेवू नका. थंड हवा आत फिरण्यासाठी थोडी जागा असणं गरजेचं आहे. पण फ्रिज पूर्ण रिकामाही ठेवू नका. काही बाटल्या किंवा पाण्याच्या बाटल्या ठेवल्याने आतलं तापमान स्थिर ठेवायला मदत होऊ शकते.
FRIDGE ELECTRICITY SAVING TIPS
esakal
फ्रिज अगदी भिंतीला चिकटवून ठेवू नका. मागच्या बाजूला हवा खेळती राहण्यासाठी थोडी जागा ठेवा. त्यामुळे फ्रिजला उष्णता बाहेर सोडायला मदत होते.
FRIDGE ELECTRICITY SAVING TIPS
esakal
फ्रिजच्या दरवाजाला लावलेलं रबर सैल किंवा खराब झालं असेल, तर थंड हवा बाहेर जाऊ शकते. त्यामुळे कॉम्प्रेसरला जास्त वेळ काम करावं लागू शकतं. रबर नीट बसतंय का, हे एकदा तपासा.
FRIDGE ELECTRICITY SAVING TIPS
esakal
गरम भाजी, आमटी किंवा दुसरा पदार्थ थेट फ्रिजमध्ये ठेवू नका. तो आधी थोडा थंड होऊ द्या आणि मग फ्रिजमध्ये ठेवा.
FRIDGE ELECTRICITY SAVING TIPS
esakal
फ्रिजची योग्य सेटिंग ठेवणं, दरवाजा वारंवार न उघडणं आणि फ्रिजची योग्य देखभाल करणं यामुळे अनावश्यक वीज वापर कमी करता येतो.
FRIDGE ELECTRICITY SAVING TIPS
esakal
Warm Water Benefits
esakal