सकाळ डिजिटल टीम
तळलेली खजूर खाल्यास आरोग्यास अनेक फायदे मिळतात. या खजूराचे विशिष्ट फायदे आणि गुणधर्म कोणते आहेत जाणून घ्या.
खजूरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी६ आणि लोह यांसारखी अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे अढळतात.
तळलेले खजूर शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी एक चांगला पर्याय मानले जाते.
खजूरमध्ये नैसर्गिक शर्करा (ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज) भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. व्यायाम करण्यापूर्वी किंवा थकवा जाणवत असताना ते खाणे फायदेशीर मानले जाते.
खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स आणि फेनोलिक ऍसिडसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतात.
खजूरमधील पोटॅशियम आणि फायबर हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. पोटॅशियम रक्तदाब (blood pressure) नियंत्रित करण्यास मदत करते, तर फायबर कोलेस्ट्रॉल (cholesterol) कमी करण्यास उपयुक्त मानले जाते.
खजूर नैसर्गिकरित्या गोड असल्यामुळे साखरेला पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. यामुळे प्रक्रिया केलेल्या साखरेचा वापर टाळता येतो.
खजूरमधील फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास आणि नियमित मलविसर्जनास मदत करते.
खजूरमधील जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात.