Sandeep Shirguppe
खडीसाखर खाण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात, याला आयुर्वेदात महत्व असल्याने अनेकजण वापर करतात.
खडीसाखर आणि गार दूध मिळून शरीरातील उष्णता कमी करण्यात मदत होते.
खडीसाखर नैसर्गिक ग्लुकोजचा स्रोत असून थकवा, कमजोरी यावर त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते.
मेंदूला विश्रांती देण्यासाठी रोज खडीसाखर आणि दुधाचे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
खडीसाखर हे पचनासाठी हलके असून गार दूधासोबत घेतल्यास अॅसिडिटी, जळजळ यावर आराम मिळतो.
खडीसाखर गार दूधासोबत घेतल्यास तोंडाला गोडसर चव राहते व ताजेपणा जाणवतो.
थंड दूध आणि खडीसाखर मानसिक तणावात फायदेशीर ठरतात.
डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खडीसाखर वापरावी.