Aarti Badade
भारताने विकसित केलेल्या अर्जुन Mk 1A टँकमध्ये चार सैनिक बसू शकतात. हा टँक एका मिनिटात ६ ते ८ शेल फायर करू शकतो आणि ताशी ७० किमी वेगाने धावतो. त्याची ऑपरेशनल रेंज ४५० किमी आहे.
रशियात तयार झालेला आणि भारतात सुसज्ज करण्यात आलेला टी-९० भीष्म रणगाडा १२५ मिमी स्मूथबोअर तोफेने सज्ज आहे. याची रेंज ५५० किमी असून तो ४३ शेल साठवू शकतो. गती ६० किमी/तास आहे.
भारतीय सैन्यातील टी-७२ अजय हा रशियन टँकची भारतीय आवृत्ती आहे. ७८० अश्वशक्तीच्या इंजिनसह तो ६० किमी/तास वेगाने चालतो आणि ४६० किमी अंतर पार करू शकतो.
के-९ वज्र ही स्वयंचालित हॉवित्झर टँक आहे, जी १००० अश्वशक्तीच्या इंजिनने सज्ज आहे. तिचा वेग ६७ किमी/तास असून ऑपरेशनल रेंज ३६० किमी आहे. भारतीय लष्करात याचे १०० पेक्षा अधिक युनिट्स कार्यरत आहेत.
विजयंता हा भारताचा पहिला स्वदेशी टँक असून १९६५ आणि १९७१ च्या युद्धात त्याने पाकिस्तानी सैन्याला चोख प्रतिकार दिला. त्याची गती ५० किमी/तास असून रेंज ५३० किमी आहे.
सारथ हे भारतीय लष्कराचे एक बहुउद्देशीय वाहन आहे. हे ३० मिमी ऑटोमॅटिक तोफ, ७.६२ मिमी मशीन गन आणि अँटी-टँक गाईडेड मिसाईलसह सज्ज आहे. हे कोणत्याही भूभागात सहज फिरू शकते.
बोफोर्स तोफेच्या भारतीय आवृत्ती धनुषमध्ये १५५ मिमी/४५ कॅलिबरची क्षमता आहे. ती ३८ किमी अंतरावर मारा करू शकते आणि बर्स्ट मोडमध्ये १५ सेकंदात ३ शेल फायर करते.
एम-७७७ ही अल्ट्रा-लाइट हॉवित्झर आहे. ही एका मिनिटात ७ गोळे फायर करू शकते, आणि २४ ते ४० किमी मारा रेंज आहे. ती उंच ठिकाणी चिनूक हेलिकॉप्टरने वाहून नेली जाऊ शकते.