kimaya narayan
स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज यांचा खराखुरा इतिहास छावा सिनेमाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात पोहोचतोय. सिनेमात फक्त औरंगझेब विरुद्ध छत्रपती शंभूराजांची लढाई असली तरीही इतर राज्यकर्तेही त्यांना टरकून होते.
वडिलांप्रमाणेच छत्रपती शंभूराजे हे एक कुशल आणि पराक्रमी राज्यकर्ते होते. त्यांच्या कारकिर्दीत आलेल्या प्रत्येक संकटांचा त्यांनी धैर्याने सामना केला.
ते एक उत्तम साहित्यिक होतेच पण याशिवाय त्यांचा रणांगणावरील पराक्रमही अतुलनीय होता. ते कुशल योद्धे होते. शत्रुंना त्यांचा इतका धाक होता की त्यांना त्यांची राजधानी सोडून पळून जावं लागलं.
यात सगळ्यात पहिला क्रमांक लागतो पोर्तुगिजांचा. स्वराज्याला सतत हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या, लोकांचा अनन्वित छळ करणाऱ्या पोर्तुगिजांना छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी असा काही धडा शिकवला कि त्यांना त्यांची राजधानी गोव्यातून मुरगावमध्ये हलवावी लागली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या तडाख्याला ब्रिटिश इतके घाबरले कि त्यांनी मुंबई विकण्याचा प्रस्ताव छत्रपती संभाजी महाराजांना दिला.
तर मुघल बादशाह औरंगझेबने छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर केलेल्या हल्ल्यानंतर इतका धसका घेतला की त्यांना संपवण्यासाठी तो स्वतः त्याची राजधानी दिल्ली सोडून दख्खनमध्ये आला. इतकंच नाही तर त्याने त्याचं प्रिय तख्त आणि मुकुटाचा त्याग केला तो कायमचाच.
असं म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत एकही लढाई हरली नाही. त्यांनी एकूण 120 लढाया लढल्या आणि त्यातील एकही हरली नाही असं म्हटलं जातं.