kimaya narayan
महाराष्ट्राला लाभलेले थोर समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले. गरिबांच्या बाबतीत आणि स्त्रियांच्या बाबतीत महात्मा फुलेंनी केलेलं कार्य अतुलनीय आहे.
स्त्रियांना शिक्षणाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क मिळवून देण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा आहे. याबरोबरच समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं.
पण तुम्हाला माहितीये का मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते निळू फुले हे महात्मा फुले यांचे खापरपणतु आहेत ?
खुद्द निळू फुले यांनी एका जुन्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. कुमार केतकर यांना दिलेल्या मुलाखतीत निळू फुले यांनी मी महात्मा फुलेंचा खापरपणतु असल्याचा खुलासा केला.
या मुलाखतीत त्यांनी सांगितलं कि, तीन चार पिढ्या आम्ही पुण्यात आलो. आमची काही मंडळी मूळ गावात राहत होती आणि फुले गंजपेठेत जेव्हा आले तेव्हा काहीजण त्यात आम्ही होतो. काही मंडळी अजूनही मूळ गावी राहतात असं त्यांनी सांगितलं.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे निळू भाऊ खापर पणतू आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना मूल नसलं तरीही त्यांच्या भावंडांपैकीच्या एका पिढीत निळूभाऊंचा जन्म झाला.
निळू फुलेंची लेक गार्गी ही सुद्धा मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
लवकरच गार्गी निळू फुले यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची निर्मिती करणार आहे.