kimaya narayan
आज 26 जानेवारीला आपण आपल्या देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. अनायसे रविवार आहेच आणि काही प्लॅन नसेल तर कुटूंबाबरोबर तुम्ही हे देशभक्तीपर सिनेमे जरूर एन्जॉय करू शकता.
1997 साली रिलीज झालेला बॉर्डर हा सिनेमा तुम्ही आज नक्की एन्जॉय करू शकता. 1971 च्या युद्धावर आधारित असलेला हा सिनेमा त्यावेळेचा सुपरहिट चित्रपट होता.
1999 च्या कारगिल युद्धावर आधारित एल ओ सी कारगिल हा सिनेमाही आज तुम्ही एन्जॉय करू शकता. या सिनेमात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या.
ऑस्करच्या शर्यतीत शेवट्पर्यंत टिकलेला भारतीय सिनेमा म्हणजे लगान. स्वातंत्र्यपूर्व भारतातील ब्रिटिश आणि भारतीय गावकरी यांच्यात खेळली गेलेलं क्रिकेट मॅच यावर असं सिनेमाचं कथानक आहे.
1857 च्या स्वातंत्र्य उठावाचा नायक मंगल पांडे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा बॉलिवूडमधील क्लासिक सिनेमा आहे. आमिर खानची या सिनेमात मुख्य भूमिका होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला गांधीजींच्या आयुष्यावर आधारित गांधी हा सिनेमा तुम्ही आज पाहायलाच हवा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावर आधारित सरदार हा सिनेमा तुम्ही पाहू शकता. परेश रावल यांची मुख्य भूमिका होती.
आमिर खान, शर्मन जोशी, सिद्धार्थ आणि आर माधवन यांची मुख्य भूमिका असलेला देशभक्तीची मॉडर्न व्याख्या सांगणारा हा सिनेमा आज तुम्ही जरूर पाहू शकता.
शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला एक सुंदर सिनेमा स्वदेस आज तुम्ही जरूर पाहू शकता.