'या' मराठी कलाकारांनी रुपेरी पडद्यावर गाजवली छत्रपती शिवरायांची भूमिका

kimaya narayan

महाराष्ट्राचं आराध्य दैवत

अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इस्लामी राजवटीत मराठ्यांच्या हक्काचं स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवबांसमोर आपण सगळेच नतमस्तक होतो.

Actor who play chhatrapati shivaji maharaj role

रुपेरी पडद्यावर कलाकारांनी साकारले शिवबा

छत्रपती शिवरायांची भूमिका नाटक, मालिकांमधून साकारण्याची इच्छा प्रत्येक मराठी कलाकाराची असते. पण काही कलाकारांनी ही भूमिका अक्षरशः जगली. जाणून घेऊया या कलाकारांविषयी.

Actor who play chhatrapati shivaji maharaj role

डॉ. चंद्रकांत मांढरे

मराठी सिनेमांच्या सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली ती अभिनेते डॉ. चंद्रकांत मांढरे यांनी. अनेकांना ते खरोखरच महाराज वाटायचे. अजूनही कित्येक मराठी घरात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे फोटो पुजले जातात.

Actor who play chhatrapati shivaji maharaj role

सूर्यकांत मांढरे

चंद्रकांत मांढरे यांच्या पाठोपाठ सूर्यकांत यांनीही काही सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यांनी साकारलेली भूमिकाही अनेकांना आवडली.

Actor who play chhatrapati shivaji maharaj role

डॉ. अमोल कोल्हे

चंद्रकांत आणि सूर्यकांत यांच्यानंतर बराच काळ मराठी मनाला भावतील असे शिवछत्रपती कुणीही साकारले नाहीत. पण प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण झाली खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या. रूपात. स्टार प्रवाहावरील राजा शिवछत्रपती मालिकेत साकारलेली छत्रपतींची भूमिका त्यांनी अजरामर केली.

Actor who play chhatrapati shivaji maharaj role

शरद केळकर

बॉलिवूडमध्ये आजवर छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याचं धाडस कुणीही केलं नव्हतं. पण शरद केळकरने तान्हाजी या सिनेमात ही भूमिका साकारत सगळ्यांची मनं जिंकली. आजही अनेकजण शरदने ही भूमिका पुन्हा साकारावी अशी इच्छा व्यक्त करतात.

Actor who play chhatrapati shivaji maharaj role

चिन्मय मांडलेकर

डॉ. अमोल कोल्हे यांच्यानंतर मराठी इंडस्ट्रीला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी चेहरा मिळाला अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या रूपात. शिवराज अष्टक सिनेसिरीजमध्ये त्याने साकारलेली महाराजांची भूमिका मराठी मनात ठसली आहे.

Actor who play chhatrapati shivaji maharaj role

शंतनू मोघे

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्तमपणे साकारत अभिनेता शंतनू मोघेने सगळ्यांना चकित केलं. आजही अनेकांना त्याने ही भूमिका पुन्हा साकारावी असं वाटतं.

Actor who play chhatrapati shivaji maharaj role
chhaava
छावाचा नवा टीझर पाहिला का ?- येथे क्लिक करा