kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची चर्चा खूप असते.
प्राजक्ताने नृत्यांगना म्हणून सुरुवात केली. दम दमा दम या कार्यक्रमातून तिची सुरुवात झाली आणि त्यानंतर तांदळा सिनेमातून तिने अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.
पण तिचं खरं अभिनेत्री म्हणून पदार्पण झालं फिरुनी नवी जन्मेन मी या मालिकेतून. त्यानंतर स्टार प्रवाहवरील तिची सुवासिनी ही मालिका चर्चेत राहिली.
प्राजक्ताला सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली ती जुळून येति रेशीमगाठी या मालिकेतून. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
काही रिपोर्ट्सनुसार प्राजक्ता एका सिनेमासाठी १५ ते २० लाख रुपये मानधन आकारते पण आता फुलवंतीनंतर हा आकडा वाढलेला असू शकतो.
प्राजक्ताचं मुंबईत स्वतःच घर आहे, तिने पुण्यातही घर घेतलं आहे. तर कर्जतला तिचं फार्महाऊस आहे, इतकंच नाही प्राजक्तराज नावाचा तिचा दागिन्यांचा ब्रँड आहे. २०२२ मध्ये तिची संपत्ती १६-४० करोडच्या आसपास होती.
प्राजक्ताचा आता चिकी चिकी बुबुम बूम हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.