Aarti Badade
भारताने 7 मे 2025 रोजी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
कोटली, बहावलपूर, मुजफ्फराबाद आणि पंजाब प्रांतातील लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे लॉन्च पॅड लक्ष्य केले गेले.
24 मिसाईल्सचा वापर, राफेल फायटर जेट्स, SCALP आणि Hammer सारख्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापर.
भारत सरकारने स्पष्ट केले की पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केलेले नाही, केवळ दहशतवादी तळ नष्ट केले.
28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारताने उरी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता.
भारतीय सैन्याने जमिनीवरून LOC पार करून थेट दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. 45 दहशतवादी ठार झाले होते.
सर्जिकल स्ट्राइक जमिनीवरून तर ऑपरेशन सिंदूर हवाई हल्ला होता. दोन्ही ठिकाणी लक्ष्य दहशतवादीच.
राफेलमधून टार्गेट केले गेले. SCALP आणि Hammer सारख्या मिसाईल्सने दहशतवादी तळ भुईसपाट.
भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं की दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, तो देश कुठलाही असो.