सूरज यादव
'कांटा लगा' गर्ल आणि बिग बॉस १३ फेम शेफाली जरीवाला यांचे २७ जून २०२५ रोजी वयाच्या ४२व्या वर्षी निधन झालंय. तिच्याआधी बिग बॉसमधील ७ स्पर्धकांचा अचानक मृत्यू झालाय.
बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचंही अकस्मात निधन झालं होतं. 2021मध्ये हार्ट अटॅकमुळे वयाच्या 40 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
वादग्रस्त आणि चर्चेत राहणारा बाबा अशी ओळख राहिलेल्या स्वामी ओम यांचंही २०२१ मध्ये निधन झालंय. बिग बॉस 10 मध्ये सहभागी झालेला स्वामी ओम अनेक कारणांमुळे वादात राहिला होता.
बिग बॉस ७ मध्ये दिसलेल्या प्रत्युषा बॅनर्जीने २०१७ मध्ये आत्महत्या केली होती. त्यावेळी ती २४ वर्षांची होती.
बिग बॉस १४ ची स्पर्धक सोनाली फोगाट यांचा 2022 मध्ये गोव्यात मृत्यू झाला. प्राथमिक अहवालात हृदयविकाराचा झटका म्हटलं गेलं, पण नंतर हत्या झाली असावी या संशयावरून चौकशीही केली गेली.
बिग बॉस मल्याळमच्या पहिल्या सीजनमध्ये सोमदास सहभागी झाले होते. २०२१ मध्ये कोरोनाच्या महासाथीत त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातच निधन झालं.
कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉस स्पर्धक जयश्रीने देखील 2021 मध्ये आत्महत्या केली. आत्महत्येने कन्नड मनोरंजन विश्व हादरलं होतं. मानसिक तणावात असल्याचं तिच्या सोशल मीडियावरून समोर आलं होतं.
बिग बॉस २ च्या घरात जेड गुडी दिसली होती. तिचं २००९ मध्ये निधन झालं. जेडला कर्करोगाचा त्रास होता.