kimaya narayan
येत्या शनिवारी 8 मार्चला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. तुमच्या मैत्रिणींबरोबर किंवा घरातील महिला सदस्यांबरोबर जर मुव्ही टाईम एन्जॉय करणार असाल तर हे मराठी सिनेमे नक्की पाहा.
हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धूम केली. फॉरेन ट्रीपला गेलेल्या सात महिलांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळते. अमेझॉन प्राईमवर हा सिनेमा तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता.
केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा सिनेमा वुमेन्स डे साठी परफेक्ट सिनेमा ठरू शकतो. सहा बहिणींची गोष्ट असलेला हा सिनेमा अजिबात मिस करू नका.
प्रिया बापट आणि सई ताम्हणकरची वजनदार स्टोरी असलेला सिनेमाही तुम्ही वुमेन्स डे ला पाहू शकता. वजन कमी करू पाहणाऱ्या दोन बायकांची धमाल गोष्ट तुम्ही नक्की एन्जॉय कराल.
गोवा ट्रीपला गेलेल्या तीन मैत्रिणींची गोष्ट गर्ल्स या सिनेमात पाहायला मिळेल. अन्विता फलटणकर, अंकिता लांडे, केतकी नारायण यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला पोश्टर गर्ल हा सुद्धा एक धमाल सिनेमा तुम्हाला पाहता येईल. गावात लग्नासाठी मुलगी मिळत नसलेल्या तरुणांना सोनाली कसा धडा शिकवते हे या सिनेमात पाहता येईल.
कामावर जाणारी बाई आणि तिचा हात असलेली मोलकरीण यांची धमाल गोष्ट नाच गं घुमा या सिनेमात पाहायला मिळेल. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षितची मुख्य भूमिका असलेला बकेट लिस्ट हा सिनेमाही तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता.