kimaya narayan
ज्योतिषशास्त्रातुन अनेक गूढ प्रश्नांची उत्तर मिळतात. गेले काही दिवस संपूर्ण जगाला विविध घटनांचा सामना करावा लागला आहे. या घटनांविषयीच्या भविष्यवाण्या आधीच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून तज्ज्ञांनी केल्या होत्या.
12 जूनला झालेला विमान अपघात असो किंवा पहलगाम दहशतवादी हल्ला अशा अनेक घटनांवरून हे वर्षं संकटांनी भरलेलं असणार याची भविष्यवाणी वर्षाच्या सुरुवातीलाच केलेली होती. यावर्षी महागाई, युद्ध, पूर, त्सुनामी, रोगराई अशा अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.
न्यूमरॉलॉजी आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्षं मंगळाचं आहे. त्यामुळे यावेळी अनेकांना विविध प्रकारचं नुकसान झेलावे लागू शकतं. याशिवाय आग लागणे, ज्वालामुखीचा उद्रेक, वाहनांचा अपघात अशा अनेक घटना यावर्षी घडणार असल्याचं तज्ज्ञ म्हणत आहेत. यावर्षी प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखांना प्रवास टाळावा हे जाणून घेऊया.
अनेक ज्योतिष तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जरी जून महिना संपत आला असला तरीही 22 तारखेला प्रवास करू नये. लांबचा प्रवास शक्यतो या तारखेला करू नये.
जुलै महिन्यात 2, 11, 20, 29 या तारखेला लांबचा, परदेशातील प्रवास टाळा. यादिवशी कोणतीही जोखमीची कामे किंवा साहसी खेळ खेळू नका.
या महिन्यात 1, 10, 19, 28 या तारखांना प्रवास करू नका.
सप्टेंबरमध्ये 9, 18,27 तारखेला प्रवास करू नका.
या महिन्यात 8,17, 26 ला प्रवास करू नये.
या महिन्यात 7, 16, 25 तारखांना प्रवास करू नये.
डिसेंबरमध्ये 6,15,24 तारखांना प्रवास करू नये.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.