सकाळ डिजिटल टीम
पुणे पोलीस दलातील सोनाली हिंगे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्राचार्यांना कारवाईची धमकी देत खंडणी उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Sonali Hinge
Esakal
सोनाली हिंगे या पुणे शहर पोलिसांच्या दामिनी पथकातील पोलीस आहेत. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या ओळखल्या जातात.
Sonali Hinge
Esakal
सोशल मीडियावरही त्या सक्रीय असून रिल्स स्टार अशीही त्यांची ओळख आहे. पोलीस दलात येण्याआधी त्या कबड्डीपट्टूही होत्या.
Sonali Hinge
Esakal
सोनाली हिंगे यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास केला. अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न होतं.
Sonali Hinge
Esakal
पीएसआय परीक्षेत त्यांना यशानं थोडक्यात हुलकावणी दिली. शेवटी खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या पोलीस भरतीत उतरल्या आणि यश मिळवलं.
Sonali Hinge
Esakal
गेल्या १२ वर्षांपासून सोनाली हिंगे पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. यात त्यांनी वाहतूक विभाग, कोंढवा पोलीस स्टेशन आणि शिवाजीनगर इथं काम केलंय.
Sonali Hinge
Esakal
शिवाजीनगर पोलीस ठाण्या अंतर्गत आता सोनाली हिंगे यांच्याकडे दामिनी पथकाच्या दामिनी मार्शल म्हणून जबाबारी आहे.
Sonali Hinge
Esakal
रिल्स स्टार अशीही ओळख असणाऱ्या सोनाली हिंगे यांच्यासह पोलीस दलातील तिघांवर आऱोपामुळे खळबळ उडाली आहे.
Sonali Hinge
Esakal
Hormuz islands
Esakal