kimaya narayan
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे स्वभाव, भविष्य आणि नशीब वेगवेगळं असतं. पण प्रत्येक राशीच्या माणसाच्या मनात एक मोठी भीतीही असते. जाणून घेऊया वेगवेगळ्या राशींच्या माणसांना नेमकी कशाची भीती वाटते ?
मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जवळच्या मित्रांना गमावण्याची भीती वाटत असते. त्यांना या गोष्टीची जाणीव नसते की त्यांच्या कृतीमुळे त्यांचे मित्र दुखावू शकतात. मेष राशीच्या लोकं त्यांच्या मित्रांना गमावणं आवडत नाही आणि याचा पश्चाताप त्यांना कायम राहतो.
वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत आराम करायला आवडतो आणि प्रत्येक गोष्ट पैशाने मिळते असं त्यांना वाटतं. म्हणून त्यांना पैशांचं नुकसान याची भीती वाटते. म्हणून ते त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल सतर्क असतात आणि कुणालाही उधार पैसे देत नाहीत.
मिथुन राशीच्या लोकांना निर्णय घेताना अडचणी येतात. त्यांच्या दुहेरी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना या गोष्टीची भीती असते की त्यांच्यातील ही कमतरता लोकांना समजेल आणि त्यांची इमेज खराब होईल.
कर्क राशीच्या लोकांना आराम करायला आवडतो आणि हा आराम त्यांना मिळणार नाही याची त्यांना भीती असते. ज्या जागी ते शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या शोभून दिसणार नाहीत अशा ठिकाणी ते जाण टाळतात. त्यांना काठी परिस्थितीचा सामना करण्याची भीती वाटते.
सिंह राशीचे लोक स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजतात. त्यांच्याकडे कुणी दुर्लक्ष केलेलं त्यांना आवडत नाही. त्यांना जर कुणी कमी महत्त्व दिल नाही तर ते नाराज होतात आणि याची त्यांना खूप भीती वाटते.
कन्या राशीच्या लोकांना सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायला आवडते. त्यांना सगळ्या गोष्टी परफेक्शनने करायला आवडतात. त्यामुळे त्यांना अव्यवस्थितपणाची भीती वाटते.
तूळ राशीच्या लोकांना एकटेपणाची भीती वाटते. ते काहीवेळ सुद्धा एकटे राहू शकत नाही. त्यांना कायमच एक रोमँटिक पार्टनर हवा असतो जो त्यांना कायम खुश ठेवेल.
वृश्चिक राशीच्या व्यक्ती संवेदनशील असतात. त्यामुळे त्या जास्त लोकांमध्ये मिसळत नाहीत कारण त्यांना त्यांना त्यांचं मन दुखावण्याची भीती असते. त्यामुळे त्या त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत.
धनु राशीच्या लोकांना बंद जागांची भीती वाटते. या लोकांना फिरण्याची आवड असते पण त्यांना त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घातलेला आवडत नाही. त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या घ्यायला आवडत नाहीत.
मकर राशीची लोक मेहनती आणि कोणतंही काम व्यवस्थित पूर्ण करणारी असतात. पण त्यांना अयशस्वी होण्याची भीती सतत असते. जर ते अपयशी झाले तर ते लवकर त्यातून बाहेर येऊ शकत नाहीत.
कुंभ राशीच्या लोकांना इतरांसमोर स्वतःचं मत मांडण्याची भीती वाटते. त्यामुळे ते अनेकदा त्यांना न पटणाऱ्या गोष्टीतही मान्य करतात.
मीन राशीची लोक त्यांच्या कल्पनाविश्वात जगत असतात. त्यांना जबाबदारी घ्यायला आवडत नाही. त्यामुळे त्यातून वाचण्याचे उपाय ते सतत शोधत असतात.