kimaya narayan
अभिनेता सलमान खान फक्त त्याच्या भूमिकांमुळेच नाही तर इतर सिनेमांमध्ये केलेल्या कॅमिओ (पाहुणा कलाकार) मुळेही चर्चेत राहिला आहे. जाणून घेऊया त्याच्या या गाजलेल्या गेस्ट अपिरियन्स
सलमानने सिंघम अगेन सिनेमाच्या शेवटी चुलबुल पांडेच्या रूपात कॅमिओ करत सगळ्यांची मनं जिंकली. रोहित शेट्टीच्या कॉप सिरीजमध्ये त्याला पाहायला अनेकजण उत्सुक होते.
चिरंजीवी यांची मुख्य भूमिका असलेल्या गॉडफादर या सिनेमातही सलमानने कॅमिओ केला. त्याची एंट्री अनेकांना आवडली असली तरीही त्यात त्याने शूट केलेला सिक्वेन्स अनेकांना नापसंत पडला.
रितेश देशमुखच्या वेड सिनेमात सलमानने कॅमिओ केला. वेड लागलंय हे गाणं त्याच्यावर आणि रितेशवर चित्रित करण्यात आलं होतं. अनेकांना हे गाणं आवडलं.
वरुण धवनच्या बेबी जॉन या सिनेमातही सलमानने एंट्री केलीये. एका फायटिंग सिक्वेन्समध्ये त्याने वरुणची साथ दिली आहे.
सगळ्यात जास्त चर्चेत राहिला तो पठाण सिनेमातील कॅमिओ. शाहरुख- सलमानची ऑफस्क्रीन मैत्री पठाण -टायगरच्या रूपात पाहणं अनेकांनी एन्जॉय केलं.