kimaya narayan
नव्वदीच्या दशकातील मालिकाविश्व खूप लोकप्रिय होतं. या काळात अनेक गाजलेल्या मालिका दूरदर्शनवर रिलीज झाल्या. या मालिकांनी असे अनेक कलाकार सिनेविश्वाला दिले जे आजच्या घडीचे सुपरस्टार्स आहेत.
या यादीत सगळ्यात आघाडीचं नाव आहे शाहरुख खान. दिल्लीत थिएटरमध्ये काम करणाऱ्या या मुलाने मालिकांमधूनच पदार्पण केलं.
सर्कस ही त्याची पहिली मालिका होती. त्यानंतर त्याची फौजी ही मालिकाही गाजली.
सगळ्यांचा लाडका मॅडी म्हणजेच आर माधवननेही मालिकांमधूनच अभिनयाविश्वात पदार्पण केलं.
यूले लव स्टोरी’ आणि ‘बनेगी अपनी बात’ या त्याच्या दोन मालिका खूप गाजल्या.
उलाला गर्ल विद्या बालननेही मालिकांमधून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
हम पांच ही तिची गाजलेली मालिका. या मालिकेत तिने अशोक सराफ यांच्याबरोबर काम केलं होतं.
दिवंगत अभिनेता इरफान खाननेही मालिकांद्वारेच अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
श्रीकांत’, ‘भारत एक खोज’ आणि ‘चंद्रकांता’ यांसारख्या अनेक मालिकांमधील त्याच्या दमदार भूमिका गाजल्या.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेही मालिकांमधूनच करिअरला सुरुवात केली.
किस देश में है मेरा दिल ही त्याची पहिली मालिका होती. तर पवित्र रिश्ता ही त्याची मालिका सुपरहिट ठरली.