kimaya narayan
बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत अभिनय आणि कॉमेडी सेन्सच्या जोरावर कृष्णा अभिषेकने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. पण तुम्हाला माहितीये का आज देशभर लोकप्रिय असलेल्या कृष्णाकडे एकेकाळी पैशांचं पाकीट घ्यायलाही पैसे नव्हते.
गोविंदाचा भाचा असलेल्या कृष्णाने बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल केला. बराच काळ त्याने भोजपुरी सिनेमांमध्येही काम केलं.
स्ट्रगलच्या काळात कृष्णा त्याच्या मामाचे गोविंदाचे कपडे वापरायचा. इतकंच नाही घरखर्च चालवण्यातही बऱ्याचदा त्याला मामाची मदत घ्यावी लागायची.
कृष्णाला कॉमेडी शो मुळे वेगळी ओळख मिळाली. त्यामुळेच तो लोकप्रिय झाला त्यातच कपिल शर्मा शोने त्याचं आयुष्य बदललं.
कृष्णाला कपडे आणि बूट नवीन घेण्याची आवड आहे आणि तो दर सहा महिन्यांनी त्याचं कलेक्शन बदलत असतो. वेगवेगळ्या ब्रँडचे शूज आणि कपडे तो घेत असतो.
कपडे आणि शूजचं कलेक्शन ठेवण्यासाठी कृष्णाने नुकताच मुंबईत थ्री बीएचकेचा फ्लॅट घेतला आहे. अर्चना पुरण सिंह यांना दिलेल्या मुलाखतीत त्याने ही गोष्ट शेअर केली.
कृष्णा या फ्लॅटचा वापर फक्त कपडे आणि शूज ठेवण्यासाठी करणार आहे. विशेष म्हणजे या घराची किंमत करोडोंच्या घरात आहे.