Aarti Badade
लसूण केवळ अन्नाला स्वाद देतोच, पण त्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे उग्र वास असूनही त्याच्या सेवनाला प्राधान्य द्यायला हवे.
दहा थेंब लसणाचा रस मधामध्ये मिसळून, ते एक ग्लास पाण्यात घालून प्यायल्यास अस्थम्याच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
कोमट पाण्यात लसणाच्या रसाचे काही थेंब टाकून प्यायल्यास बसलेला घसा मोकळा होतो आणि गळा आरामदायक वाटतो.
लसणाचा रस थेट मुरूमांवर लावून पाच मिनिटांनी थंड पाण्याने धुवल्यास मुरूम कमी होण्यास मदत होते. हा उपाय दररोज मुरूम जाईपर्यंत करावा.
लसणाचा रस केसांच्या मुळांवर लावल्यास रक्तप्रवाह सुधारतो, त्यामुळे केस बळकट होतात आणि गळती कमी होते.
लसणाचे पाच थेंब लिंबाच्या रसात मिसळून हे मिश्रण केसांवर लावून रात्रभर ठेवल्यास उवा आणि लिखा नष्ट होतात.
लसणातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे त्वचेवरील जंतुसंसर्ग कमी होतो, त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते.
लसूण नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आणि लहान-मोठ्या संसर्गांपासून संरक्षण मिळते.