Aarti Badade
रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिणे आरोग्यदायी मानले जात असले, तरी काहीवेळा ते शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते.
रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिल्यास पोटात गॅस, आम्लपित्त आणि जळजळ होण्याची शक्यता वाढते.
दररोज सकाळी लिंबूपाणी घेतल्याने पचनसंस्था बिघडू शकते आणि अपचन किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
लिंबूमधील आम्ल दातांच्या संरचनेवर परिणाम करतो. त्यामुळे दात कमकुवत होण्याची शक्यता असते.
लिंबूपाणी शरीर डिटॉक्स करत असले तरी वारंवार लघवी होऊन शरीरातील पाणी कमी होऊ शकते.
अतिप्रमाणात लिंबूपाणी घेतल्याने छातीत जळजळ व अॅसिडिटी वाढते, जे दीर्घकाळ त्रासदायक ठरू शकते.
जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील, तर लिंबूपाणी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
लिंबूपाणी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, रिकाम्या पोटी घेतल्यास काही समस्यांचा धोका संभवतो. योग्य सल्ल्यानंतरच सेवन करा.