Aarti Badade
दुधासोबत दररोज २ केळी खा. केळीत भरपूर कार्बोहायड्रेट्स व कॅलरीज असतात, जे शरीराला ऊर्जा आणि वजन दोन्ही देतात.
खजूर हे कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. दुधात घालून किंवा त्यासोबत खाल्ल्यास शरीरात ताकद येते.
एका ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून प्या. मध चयापचय वाढवतो आणि दुधासोबत वजन वाढण्यास मदत करतो.
बदाम हे चांगले फॅट्स आणि प्रोटिन्सचा उत्तम स्रोत आहेत. दुधात मिसळून सेवन केल्यास मेंदू आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहतात.
अंजीर दुधासोबत खाल्ल्यास तुमच्या शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता भरून निघते आणि वजन देखील वाढते.
मुगडाळ, तूप, गूळ आणि सुकामेवा यांच्यापासून बनवलेले लाडू शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात. रोज एक लाडू दूधासोबत घेतल्यास वजन नैसर्गिकरित्या वाढते.
हे पदार्थ दुधासोबत सकाळी किंवा रात्री नियमितपणे घेतल्यास तुम्हाला परिणाम लवकर दिसू शकतात. पण अति सेवन टाळा.