लहान मुलांना औषध देताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Aarti Badade

लोहाचे थेंब थेट पाजू नका!

थेट पाजल्याने बाळाच्या दातांवर व जिभेवर काळे डाग पडू शकतात.

baby medicine tips | Sakal

आयर्नचे थेंब रसात मिसळा – आणि मग द्या!

1-2 चमचे संत्र्याचा रस, सफरचंदाचा रस यासोबत थेंब द्या. व्हिटॅमिन C आयर्नचे शोषण वाढवते.

baby medicine tips | Sakal

देऊ नका!

दुधातील कॅल्शियम आयर्नचे शोषण कमी करते – थेंब नेहमी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 2 तासांनी द्यावेत.

baby medicine tips | Sakal

कॅल्शियम आणि आयर्नमध्ये अंतर ठेवा

दोघांमध्ये किमान २ तासांचं अंतर ठेवा, अन्यथा आयर्न शरीरात शोषले जाणार नाही.

baby medicine tips | Sakal

औषध नेहमी मोजून व वेळेवर द्या

बाळाला डॉक्टरांनी सांगितलेल्या डोसनुसारच औषध द्या. वेळेचे पालन केल्यास औषधाचा परिणाम योग्य होतो.

baby medicine tips | Sakal

रिकाम्या पोटी औषध देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

सर्व औषधे रिकाम्या पोटी दिली जाऊ नयेत. काही औषधे पोटात अन्न असताना अधिक सुरक्षित असतात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महत्वाचा सल्ला

डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणात आणि वेळेनुसारच औषध द्या. चुकीचा वापर बाळाच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकतो.

baby medicine tips | Sakal

तरुण दिसण्यासाठी योगासनांची जादू!

Yoga for Youthful Glow | Sakal
येथे क्लिक करा