kimaya narayan
मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडव्याचा सण साजरा केला. मराठी सेलिब्रिटीजनेही घरी गुढी उभारत सण थाटात साजरा केला.
मराठी सेलिब्रिटी जोडी प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं.
प्रसाद ओकनेही त्याच्या कुटुंबाबरोबर गुढीपाडव्याचा सण साजरा केला. यावेळी त्याची पत्नी, मुलगा आणि पेटही होते.
लक्ष्मीनिवास मालिकेतील अभिनेता डॉ. निखिल राजेशिर्के याने पत्नीसोबत गुढी उभारत हिंदू नववर्षाचा पहिला सण साजरा केला.
ठरलं तर मग फेम अभिनेता अमित भानुशालीने सुद्धा गुढी उभारली.
अभिनेता चेतन वढनेरे आणि त्याची पत्नी ऋतुजाने लग्नानंतर पहिला गुढीपाडवा साजरा केला.
अभिनेत्री शिवानी सोनार आणि तिचा नवरा अंबर गणपुलेनेही लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गुढीपाडव्याचा सण थाटात साजरा केला. यावेळी तिचा भाऊ आणि लेखक संदेश कुलकर्णीही उपस्थित होता.