सकाळ वृत्तसेवा
नासाने पृथ्वीच्या महासागरांच्या गूढ रहस्यांचा शोध घेण्यासाठी एक मोठं मिशन सुरू केलं आहे. याला ओशन एक्सप्लोरेशन मिशन म्हणतात.
हे मिशन फक्त महासागरातील जीवांचा अभ्यास करण्यापुरतं नाही, तर पृथ्वीबाहेरच्या एलियनच्या शक्यता शोधण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे.
नासा महासागरांच्या सर्वात खोल भागात जाऊन जीवन कसं निर्माण झालं याचे पुरावे शोधत आहे.
तिथे प्रचंड दाब, अतिशय कमी तापमान, ऑक्सिजनची कमतरता आहे. तरीही काही सूक्ष्मजीव आणि प्राणी या परिस्थितीत जिवंत राहतात, त्यांचा अभ्यास केला जातोय.
नासाने खास रोबोट्स आणि ROVS (रिमोट ऑपरेटेड व्हेईकल्स) तयार केलेत. हे समुद्र संशोधनासाठी आणि पुढे स्पेस मिशनसाठीही उपयोगी ठरणार आहेत.
या मिशनचा पुढचा टप्पा म्हणजे चंद्र आणि इतर ग्रहांवरील महासागरांची तपासणी. त्यांची रचना आणि पृथ्वीच्या महासागरांशी तुलना केली जाणार आहे.
समुद्राखाली खनिज संसाधनं आणि मौल्यवान धातूंचा शोध घेऊन भविष्यात पृथ्वीच्या गरजा भागवता येतील का, हेही तपासलं जाणार आहे.
हे संशोधन भविष्यात मंगळ आणि युरोपा (बृहस्पतीचा उपग्रह) यांसारख्या मोहिमेतही मदत करणार आहे.
नासाचं हे मिशन फक्त पृथ्वीचं नव्हे तर विश्वाचं गूढ उलगडण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं.
पुढच्या काही वर्षांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.