Anushka Tapshalkar
मोदक हे गणपतीचे प्रिय आहेत, पण यावेळी त्यालाच देऊया एक खास चविष्ट ट्विस्ट!
यासाठी लागेल: १ कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, ¼ चमचा मीठ आणि १ चमचा तेल.
१ कप ओल्या नारळाचा किस, ¾ कप गूळ (चवीनुसार), ¼ चमचा वेलदोडा पूड आणि चिमूटभर मीठ.
६-७ वाफवलेले मोदक, १ मध्यम चिरलेला कांदा, ४-५ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, फोडणीसाठी मोहरी, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरे, तिखट, हळद, मीठ आणि २ चमचे तेल.
पाणी उकळून त्यात मीठ व तेल घालावे. नंतर तांदळाचे पीठ घालून झाकून ठेवावे. थोडे थंड झाल्यावर पीठ मळून घ्यावे.
गॅसवर गूळ व नारळाचे मिश्रण शिजवावे. घट्ट होत आल्यावर वेलदोडा पूड टाका. गार झाल्यावर सारण भरून मोदक तयार करा.
मोदक वाफवायला ठेवून साधारण १०-१५ मिनिटे वाफवावे. आता ते भाजीसाठी तयार आहेत!
फोडणी करून त्यात कांदा, आले-लसूण परतवा. तिखट, हळद घालून मोदक टाका. थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजवा.
शेवटी वरून कोथिंबीर, किसलेले खोबरे टाका आणि गरमागरम वाढा!