Anushka Tapshalkar
हायपोथायरॉइड किंवा हाशिमोटो सारख्या स्थितींमध्ये काही अन्नपदार्थ थायरॉइड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे योग्य माहिती असलेला आहार निवडणे महत्त्वाचे ठरते.
शेंगदाण्यांमध्ये गॉईट्रोजेन्स असतात, जे थायरॉइड हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये अडथळा आणतात. त्यामुळे हायपोथायरॉइड किंवा हाशिमोटो असणाऱ्यांनी याचे सेवन टाळावे.
लोह, कॅल्शियम व फायबर्सने भरपूर असली तरी नाचणी ही गॉईट्रोजेनिक आहे. त्यामुळे ती महिन्यातून २–३ वेळाच आणि आधी भिजवून व नंतर शिजवून खावी.
बदामात असलेले सेलेनियम व मॅग्नेशियम यामुळे थायरॉइडसाठी ते फायदेशीर तर असतात, पण बदाम गॉईट्रोजेनिकही आहेत. त्यामुळे फक्त ३–५ बदामच रोज खावेत, तेही भिजवलेले किंवा भाजलेले.
सोयामध्ये गॉईट्रोजेन्स आढळतात, जे थायरॉइड ग्रंथीवर ताण आणतात आणि औषधांचे शोषणही अडवतात. म्हणून सोया व त्याचे पदार्थ टाळावेत.
गव्हामध्ये ग्लूटेन असते, जे गॉईट्रोजेनिक आहे. ऑटोइम्यून हायपोथायरॉइडिझम असणाऱ्यांनी गव्हाचे प्रमाण कमी ठेवावे. तसेच ग्लूटेन-फ्री आहार घेतल्यास अँटीबॉडीजची पातळी देखील घटते.
गॉईट्रोजेन्स ही अशी द्रव्यं आहेत जी थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती कमी करतात. त्यामुळे पिट्यूटरी ग्रंथी थायरॉइड-संवर्धक हार्मोन जास्त निर्माण करते आणि थायरॉइड ग्रंथी फुगते, ज्यामुळे गाठ (गॉईटर) होऊ शकते. त्यामुळे विचारपूर्वक व काळजीपूर्वक आहार महत्त्वाचा आहे.
वरील पदार्थ पोषणमूल्यांनी समृद्ध असले तरी थायरॉइड असणाऱ्यांनी ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे आवश्यक आहे. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय आहारात कोणतेही बदल करू नये. त्यांच्या सल्ल्यानेच आहार घ्यावा.