Aarti Badade
भारत देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या जवानांना दिले जाणारे ‘परमवीर चक्र’ हे सर्वोच्च सन्मानचिन्ह आहे.
या ऐतिहासिक पदकाचे डिझाइन एका मराठमोळ्या महिलेने – सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले आहे. पण त्या मूळच्या भारतीयही नव्हत्या!
सावित्रीबाईंचा जन्म १९१३ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये ‘इव्हा युओन लिंडा’ या नावाने झाला. वडील हंगेरियन, आई रशियन. भारताशी दूर-दूरपर्यंत संबंध नव्हता.
१६व्या वर्षी एका ब्रिटिश लष्करी गटात असलेल्या मराठी विक्रम खानोलकर यांच्यावर प्रेम झाले. वडिलांचा विरोध झुगारून १९३२ मध्ये त्यांनी भारतात येऊन विवाह केला.
विवाहानंतर ‘सावित्रीबाई’ झाल्यानंतर त्यांनी भारतीय परंपरा, भाषा आणि जीवनशैली अंगीकारली. मराठी, हिंदी, संस्कृत आणि गुजराती भाषांवर प्रभुत्व मिळवले.
हिंदू पुराणांतील ऋषी दधिची यांच्या आत्मत्यागातून प्रेरणा घेऊन पदक डिझाइन केले. डिझाइनमध्ये इंद्रवज्र, अशोकस्तंभ आणि शिवरायांची तलवार यांचा समावेश आहे.
या पदकाला जोडलेली जांभळी रिबीन आणि मध्यभागी असलेला अशोकस्तंभ हे त्याचे विशेष वैशिष्ट्य आहे. हे पदक शौर्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे.
सावित्रीबाईंच्या मुलीच्या दिराला – मेजर सोमनाथ शर्मा यांना १९४७ मध्ये काश्मीर युद्धातील शौर्याबद्दल पहिले परमवीर चक्र मरणोत्तर देण्यात आले.
सावित्रीबाई या भारतातल्या पहिल्या महिला पायलट होत्या. त्यांनी जालंधर येथून फ्लायिंग लायसन्स मिळवले होते.
पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी शाहिद जवानांचे कुटुंब, फाळणीतील पीडितांसाठी आयुष्य समर्पित केले. त्यांनी महाराष्ट्रातील संतांवर पुस्तकही लिहिले.