kimaya narayan
राजा रानीची गं जोडी फेम अभिनेत्री शिवानी सोनार लग्नबंधनात अडकतेय. जाणून घेऊया तिच्या लग्नाचे डिटेल्स.
शिवानीच्या लग्नापुर्वीच्या समारंभांना सुरुवात झालीये. सोशल मीडियावर सगळे फोटो व्हायरल झाले आहेत.
उद्या म्हणजे 21 जानेवारीला शिवानीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. अभिनेता अंबर गणपुलेशी लग्न करतेय.
पुण्यात शिवानीचं लग्न होणार आहे. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न होणार असल्याचं म्हटलं जातंय.
अंबरनेही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. रंग माझा वेगळा मालिकेतील त्याची भूमिका गाजली तर नुकतीच कलर्स मराठीवरील दुर्गा या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती.
काल 19 जानेवारीला त्यांचा संगीत आणि मेहंदी सोहळा पार पडला. त्यांच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
शिवानी सोनारला राजा रानीची गं जोडी या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. नुकतीच ती तू भेटशी नव्याने या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. सुबोध भावेबरोबर तिने या मालिकेत काम केलं होतं.